vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

राज्य प्रतिनिधी-.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तिपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

आरोग्य भवन, मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीदरम्यान दुर्गम भागातील आरोग्यसेवेची वस्तुस्थिती समोर आणणाऱ्या आणि आपल्या कार्यातून उल्लेखनीय परिणाम साधणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बैठकीस आमदार चित्रा वाघ, आरोग्य आयुक्त डॉ. सुनिल भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या सन्मानाचा उद्देश दुर्गम भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे, त्यांच्या कार्याला सार्वजनिक मान्यता मिळवून देणे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा देणे हा आहे.

सन्मानित अधिकारी व कर्मचारी :१. डॉ. गुणवंत कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोलगी२. डॉ. कांतीलाल पावरा, तालुका आरोग्य अधिकारी, धडगाव३. डॉ. संतोष परमार, स्त्रीरोग तज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय धडगाव४. डॉ. राहुल नायका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा५. डॉ. हिमांशू चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खुर्द६. चमेली भताने, अधिपरिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र डाब७. अंजना परमार, आरोग्य सेविका, तरंगता दवाखाना (बोट अम्ब्युलन्स), धडगाव येथील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला

संबंधित पोस्ट

मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक….

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..

vishwatmaklokswamivarta