vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पंचायत समिती अंबरनाथ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पंचायत समिती अंबरनाथ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शनाने गटविकास अधिकारी, पंडीत राठोड यांच्या संकल्पनेतुन अंबरनाथ पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरास उत्सुर्फूत प्रतिसाद मिळाला.

    सेन्ट्रल हॉस्पीटल उल्हासनगरचे सिव्हील सर्जन डॉ.बनसोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विलास वाघमारे, डॉ.हरीश बागडे, कमल शिंदे व त्याच्या टिमने अतिशय मेहनतीने हा कॅम्प यशस्वी केला.

  अंबरनाथ पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहीते आणि त्यांच्या टिमने आरोग्य तपासणीचे काम अतिशय यशस्वीपणे पार पाडले. सुमारे 250 अधिकारी व कर्मवारी यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये शुगर, बी.पी., H.B. इत्यादींची चिकित्सा करण्यात आली.

  या शिबीरात एकुण 49 अधिकारी व कर्मचारी रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यामध्ये तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.    रक्तदान कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ.विशाल पोतेकर, उपअभियंता बांधकाम पोतदार, एकात्मिक बालविकास अधिकारी योगेश यंदे, विस्तार अधिकारी सांख्यिकी प्रदीप मोहेकर, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आर.बी.महाले, पशुधन विकास अधिकारी डॉ.शितल कारगिरवार यांनी विषेश प्रयत्न केले आहेत.

 0000000 00–

संबंधित पोस्ट

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक क्लब फूट दिन उत्साहात साजरा

ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू कोरोना पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याची चिन्हं दिसताच मुंबई महानर पालिका अलर्ट…

संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांत विठ्ठलनामाची शाळा भरवित विद्यार्थ्यांनी दिंड्यांतून जागविले स्वच्छता व आरोग्याचे महत्व…

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta

हिवताप / डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत सर्व विभागांमध्ये जनजागृती शिबीरे