vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

कोकण प्रतिनिधी –

कोकणातील तारळे:  – सासपडे येथे एका नराधमाकडून झालेल्या कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ  बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तारळे गावामध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता आणि ‘तारळे बंद’ पाळण्यात आला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कोकणात तारळे परिसर सुन्न झाला असून, सदर नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी एकजूट दाखवत मोठा मोर्चा काढला होता सदर मोर्चामध्ये

मानवीय क्रूर  हत्येच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन केले होते सदर आयोजन मध्ये महिलांवर वाढणाऱ्या अत्याचार याबाबत मुद्दे मांडण्यात आले आणि,कुमारी आर्या चव्हाण हिच्या निधनाला न्याय मिळावा आणि महिलांवरील वाढते अत्याचार थांबवावेत या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा करण्यात आला होता. * वेळ: सायंकाळी ठीक ५.३० वाजता * एकत्रीकरण स्थळ: एस.टी.स्टँड, तारळे * सहभाग: या निषेध मोर्चात तारळे आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गावातील- माता भगिनींनी’ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला.एस.टी. स्टँडवर एकत्र आल्यानंतर ग्रामस्थांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने घोषणा देत संपूर्ण गावात मोर्चा काढला. यावेळी ‘आर्याला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘नराधमाला फाशी द्या’, ‘महिलांवरील अत्याचार थांबवा’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या एकदिवसीय ‘तारळे बंद’ला येथील व्यापारी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले.नागरिकांच्या भावनांचा उद्रेकयावेळी बोलताना ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका निष्पाप मुलीची इतक्या क्रूरपणे हत्या होणे हे समाजासाठी लांच्छनास्पद आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपस्थित माता-भगिनींनी या घटनेचा तीव्र निषेध करत, आरोपीला तात्काळ आणि कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.समस्त ग्रामस्थ तारळे यांच्या वतीने आयोजित या निषेध मोर्चातून, या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत, पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी आणि समाजातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

00000

संबंधित पोस्ट

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

एसटी आगारात दर बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” साजरा होणार- प्रवासी आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम…

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना काम बंद आंदोलन…

vishwatmaklokswamivarta