vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

दुर्ग राजमाची मशाल महोत्सव – शिवतेजाच्या प्रकाशात उजळला राजमाची किल्ला…!! 

दुर्ग राजमाची मशाल महोत्सव – शिवतेजाच्या प्रकाशात उजळला राजमाची किल्ला…!!

आध्यात्मिक वार्ता-

अश्विन शुद्ध पंचमी या पवित्र दिवशी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित “दुर्ग राजमाची मशाल महोत्सव सोहळा” उत्साह, भक्तिभाव आणि ऐतिहासिक जाणीव जागवणाऱ्या वातावरणात मोठ्या थाटामाटात पार पडला. हजारो युवांच्या सहभागातून आणि शेकडो मशालींच्या प्रकाशात राजमाचीचा ऐतिहासिक किल्ला तेजोमय झाला.

सोहळ्याची सुरुवात श्री गोधनेश्वर मंदिरात भगवान शंकरांच्या पवित्र उपस्थितीत शिवअभिषेकाने झाली. त्यानंतर मंदिर परिसरात १०१ मशाली आणि १००१ दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर व परिसर उजळून निघाला. वातावरणात ‘हर हर महादेव’चा घोष आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या नादाने आकाश दणाणून गेले. याच ठिकाणी शस्त्र व शास्त्र पूजन करण्यात आले, ज्यातून शिवसंस्कृती आणि धर्मसंरक्षणाची परंपरा पुन्हा जागविण्यात आली.

धर्म, पराक्रम आणि संस्कारांचा संगम असलेल्या या सोहळ्यात “मृत्युंजय महायज्ञ व्याख्यान” आयोजित करण्यात आला. प्रमुख व्याख्याते अक्षयजी चंदेल यांनी “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शंभुराजे यांचा धगधगता इतिहास, त्यांच्या अजेय पराक्रमांची गाथा आणि त्यांनी दिलेला संस्कारयुक्त धर्मवादाचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला. अक्षयजी चंदेल म्हणाले, “संभाजी महाराज म्हणजे केवळ छत्रपती नव्हेत, तर ते विचारांचे योद्धे होते. शंभुराजे म्हणजे आत्मसन्मान, बुद्धी, आणि धर्मसंरक्षण यांचा संगम. त्यांनी जेव्हा शस्त्र हाती घेतले तेव्हा तो केवळ युद्धासाठी नव्हे तर संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतला होता. त्यांच्या बलिदानाने हिंदुस्थानच्या भूमीत अस्मिता आणि श्रद्धेची मशाल पेटवली. आज आपण त्या मशालीच्या उजेडात चालणारे शिवसेवक आहोत.

या भव्य कार्यक्रमात जागरण-गोंधळाचा धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला. स्थानिक कलाकारांनी भवानी देवी, शिवराय आणि शौर्यगीतांच्या माध्यमातून उपस्थितांना इतिहासाच्या त्या गौरवशाली काळात नेले. “आजच्या युगात सोशल मीडियावर इतिहास पाहिला जातो, पण आम्ही तो प्रत्यक्ष गडावर अनुभवतो. मशालीच्या प्रकाशात उभा असलेला प्रत्येक युवक हा आजचा शिवसेवक आहे.

या सोहळ्याच्या अखेरीस गडावर सर्व उपस्थितांनी ‘जय शिवराय’च्या घोषात अखंड शिवतेजाला नमन केले. संपूर्ण वातावरण भक्तिभाव, स्वाभिमान आणि शिवसंस्कृतीच्या तेजाने उजळून निघाले. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. सर्व विभागीय कार्यकर्त्यांनी, महिला विभागाने, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

अखेर शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांनी “गडसंवर्धन हीच आमची साधना, आणि शिवकार्य हीच आमची आराधना” असा नारा देत कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे, उपाध्यक्ष अशोक झाडे, सचिव अभिजीत डांगे, समन्वयक सुचेता भिसे, प्रदेशाध्यक्षा मयुरी जायप्पा, पुणे जिल्हा विभाग प्रमुख संतोष होजगे, पनवेल विभाग प्रमुख सुरेश जगदाळे, शिवराज बहिरट, तेजस लयगुडे, प्रथमेश वावळे, स्वप्निल सोनर सह सोलापूर विभाग, पालघर विभाग, पुणे विभाग, पनवेल विभाग, बारामती विभाग, लातुर विभाग, नाशिक विभाग, वाफी विभाग आदी सदस्य उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

विठ्ठल नामाचा गजर… महाराष्ट्राच्या संतपरंपरेची रोमेनियामध्ये भक्तीमय झलक!”🚩

साधकांसाठी महत्वाचे….

vishwatmaklokswamivarta

दत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरिञ पारायण सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

vishwatmaklokswamivarta

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

जीवनात गुरुला खूप मोठे महत्व-सुनिताजी चावला

💐☘️*धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा* ☘️💐आज उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करणारा सण *रंगपंचमी* !