vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

20 मे च्या औषध विक्रेता बंद दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये; अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

20 मे च्या औषध विक्रेता बंद दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये; अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

 

राज्य, प्रतिनिधी : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) देशभरात तसेच राज्यात बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीद्वारे होणारी ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल तसेच GSR 817(E) दि. 28 ऑगस्ट 2018 आणि कोविड संदर्भातील GSR 220(E) दि. 26 मार्च 2020 हे आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी 20 मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड शहरासह तालुका व ग्रामीण भागातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णाला औषधांच्या उपलब्धतेबाबत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय नांदेड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनालाही त्यांच्या औषध भांडारात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे.

बंदच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अथवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8369027068 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, जेणेकरून संभाव्य गैरसोय टाळता येईल, असेही अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ.तु. राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ज्येष्ठ निरूपणकार ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन· मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा 

गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेश प्रक्रिया सुरू…

मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासातीलसंधी ओळखून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- शासकीय तंत्रनिकेतन, मिरजमध्ये डिजीटल सुविधा, सौर विद्युत प्रकल्पाचे उद्‌घाटन- डिजीटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञान मिळवण्याची सुवर्णसंधी

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले