vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

नवी दिल्ली प्रतिनिधी : तंबाखूविरोधी लढा हा केवळ आरोग्याचाच प्रश्न नाही तर याचा संबंध देशभरातील लाखो युवकांच्या आयुष्याशी आहे. ही एक सामाजिक आणि शैक्षणिक सकारात्मक मोहिम आहे. यावर्षीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिन 2025 च्या निमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘मायगॉव्ह’च्या (MyGov) सहकार्याने ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन जनजागृती प्रश्नमंजूषा 2025’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम करणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही प्रश्नमंजुषा 12 भाषांमध्ये उपलब्ध असून मराठीसह, इंग्रजी, हिंदी, असमी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, उडिया आणि पंजाबी यापैकी कोणत्याही भाषेत स्पर्धकांना भाग घेता येऊ शकेल हे या प्रश्नमंजुषेचे वैशिष्टये आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणा 2020 च्या सुसंगत असे हे पाऊल आहे. यामुळे स्थानिक आणि प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण, जनजागृतीला प्रोत्साहन मिळेल

या प्रश्नमंजूषेत सहभागी होणे सोपे असून ही सर्वांसाठी खुली आहे. https://quiz.mygov.in/quiz/world-no-tobacco-day-awareness-quiz/ या संकेतस्थळावर जाऊन ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन जनजागृती प्रश्नमंजूषा 2025’ हा पर्याय निवडा, आपल्या पसंतीची भाषा निवडा आणि मोबाईल क्रमांक किंवा ईमेलच्या सहाय्याने नोंदणी करून प्रश्नमंजुषा सुरू करा. ही प्रश्नमंजूषा विनामूल्य, सुलभ आणि माहितीपूर्ण आहे. प्रत्येक सहभागीला मायगॉव्हकडून डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात – प्रतिदिन सहा कोटींची तूट

vishwatmaklokswamivarta

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना..

vishwatmaklokswamivarta

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश