vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

 

सातारा,  प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ४२ गावे आणि २७५ वाड्यांमधील एकूण ६३ हजार ९९० लोकसंख्या टंचाईने बाधित झाली आहे. तसेच ५३ हजार ८०७ पशुधनही या टंचाईमुळे बाधित झाले आहे. या बाधित गावांना व वाड्यांना ३९ टँकद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या एकूण ३९ टँकर प्रत्यक्ष सुरू करण्यात आले असून यामध्ये १ शासकीय आणि ३८ खाजगी टँकरचा समावेश आहे. यात सर्वाधिक टंचाईची तीव्र ताण माण तालुक्यात दिसून येत आहे. माण तालुक्यातील ३५ गावे आणि २३९ वाड्यांतील ५६ हजार १५७ लोकसंख्येसाठी ३५ टँकर सुरू आहेत.

खटाव तालुक्यात ७ गावे आणि ३६ वाड्यांतील ७,८३३ लोकसंख्येला ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात ३ गावे आणि ४ वाड्यांतील २ हजार २२२ लोकसंख्या बाधित असून तेथे ३ टँकर मंजूर करण्यात आले आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात ८५.६० फेऱ्या मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी दररोज ८१ फेऱ्या (९४.६३ टक्के) पूर्ण करून टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

00000

संबंधित पोस्ट

खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक

पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ,५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा..