vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी https://raigad.gov.in या संकेत स्थळावरून देण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांसह आपला अर्ज दि.15 मे 2025 रोजी सायं. 06.15 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी 2 केंद्र स्थापन करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना “आपले सरकार सेवा केंद्र” हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडींग करण्यात आले आहे.

तरी नवीन आपले सरकार सेवा केंद्राचा अर्ज भरते वेळी तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी कालावधी 30 दिवस, दि.16 एप्रिल ते दि.15 मे 2025 पर्यंत. प्राप्त आपले सरकार सेवा केंद्राच्या मागणी अर्जांची छाननी कालावधी 15 दिवस, दि.16 मे ते दि.30 मे 2025 पर्यंत. प्राप्त आपले सरकार सेवा केंद्राच्या मागणी अर्जांवर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता छाननी कालावधी 15 दिवस, दि.02 जून  ते दि.16 जून 2025 पर्यंत.

000000

संबंधित पोस्ट

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार- मंत्री आदिती तटकरे