vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत २० ठिकाणी मेळावे मुंबईतील जास्तीत जास्त उमेदवारांनी नावनोंदणी करावी

मुंबई शहर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत २० ठिकाणी मेळावेमुंबईतील जास्तीत जास्त उमेदवारांनी नावनोंदणी करावी..

मुंबई, प्रतिनिधी:राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण २० विविध ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत. या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील जास्तीत जास्त उमेदवारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त सुनील पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

उद्योग क्षेत्राची गरज लक्षात घेऊन तरुणांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे हा या विश्वविक्रमी महाकुंभ मेळाव्याचा व प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. मुंबई शहर व परिसरातील सर्व खासगी कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, बँकिंग, रिटेल, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व रिक्त पदांची (Vacancies) माहिती https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6 या लिंकवर नोंदवून या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्रा’मध्ये सहभागी व्हावे. या माध्यमातून उद्योजकांना त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ थेट निवडण्याची मोठी संधी मिळणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर (Graduates), पदव्युत्तर, आयटीआय (ITI), डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्ये असलेले सर्व पात्र उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी त्वरित https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली पूर्वनोंदणी पूर्ण करावी.

रोजगार मेळाव्यासाठी निवडलेली २० प्रमुख केंद्रे ही चर्चगेट, माटुंगा, फोर्ट, दादर, सायन, वडाळा, भायखळा आदी परिसरांमध्ये आहेत. यामध्ये एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (चर्चगेट), रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (फोर्ट), एमव्हीआयआरडीसी जागतिक व्यापार केंद्र (कफ परेड) आणि न्यायवैद्यक शास्त्र संस्था (एचबीएसयू) (फोर्ट/चर्चगेट) यांचा समावेश आहे.

तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये सेंट झेवियर्स तांत्रिक संस्था (माहीम), मुंबई तांत्रिक अभियांत्रिकी विद्यालय (दादर/मुंबई), अंजुमन-ए-इस्लामचे एम.एच. साबू सिद्दिक तंत्रनिकेतन (भायखळा) तसेच ए.आय.चे आतिथ्य व्यवस्थापन संस्थान (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) यांचा समावेश आहे.

रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, गुरु नानक खालसा महाविद्यालय, श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय आणि डी. जी. रुपारेल महाविद्यालय माटुंगा येथे आहेत.गुरु नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायन येथे, तर एस.आय.डब्ल्यू.एस. एन. आर. स्वामी महाविद्यालय व श्रीमती थिरुमलाई महाविद्यालय वडाळा येथे आहेत.

याशिवाय सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (फोर्ट)डेव्हलर्न तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड (दादर), जय हिंद महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (चर्चगेट), भवन एच. सोमाणी महाविद्यालय (गिरगाव/चौपाटी) तसेच लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (महालक्ष्मी) येथे रोजगार मेळावे होणार आहेत..०००

संबंधित पोस्ट

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न – स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तीन टप्प्यांसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित- जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 11 डॉग शेल्टरसाठी पावणेपाच कोटींची भरीव तरतूद,- महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना