vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही – महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे कळंब तालुक्यातील नरसापूर येथील दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी

शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही – महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे कळंब तालुक्यातील नरसापूर येथील दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी..

यवतमाळ, प्रतिनिधी : राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कळंब तालुक्यातील नरसापूर येथील दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, वीज, पाण्याच्या उपलब्धतेबाबत विचारपूस केली. तसेच पाणीबचतीच्या कामांसह पीक पाहणी, पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. शासन गतीने काम करत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले

यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ॲड. प्रफुल्ल चव्हाण, नितीन भुतडा, प्रिया तोडसाम, आरती फुफाटे, देवानंद पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अभय देशपांडे, गटविकास अधिकारी अजय चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

पीक पेराचा विषय ऑन द स्पॉट मार्गी या पाहणी दौऱ्यादरम्यान डीसीएस ॲपवर पीक पेरा नोंदणी केल्यानंतर सॉफ्टवेअर/संकेतस्थळावर हा पीक पेरा प्रदर्शित होत नसल्याची बाब महसूल मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्याची वेळीच दखल घेत अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त यांना कॉन्फरन्स कॉल करून अडचणी सोडविण्याचे निर्देश महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

००००

संबंधित पोस्ट

प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta