vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

    नवी मुंबई प्रतिनिधी-  मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. यामध्ये आयोगामार्फत दिलेल्या 45588 संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये 13336 दुबार मतदार आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ते कोणत्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावावर मतदान करणार याचे विकल्प स्वरुपातील हमीपत्र भरुन घेण्यात आले आहे.

   महापालिका क्षेत्रात मा. राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने प्राप्त दुबार मतदारांच्या यादीनुसार तपासणी करण्यासाठी प्रभागनिहाय बीएलओ यांची पथके स्थापन करण्यात आली होती. दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संगणक प्रणालीव्दारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा यादी भागाप्रमाणे मतदार यादीचे वर्गीकरण करण्यात आले व छायाचित्रे असलेली दुबार मतदारांची यादी बीएलओ यांच्याकडे पडताळणीसाठी देण्यात आली होती.

    बीएलओ मार्फत मतदार यादीतील या संभाव्य दुबार नावांचा शोध घेऊन, फोटो पडताळणी करुन, ही नावे काणत्या प्रभागात आहेत, छायाचित्रात साम्य आहे काय, आई वडीलांच्या नावात साम्य आहे काय, पत्ता सारखा आहे काय – अशा विविध प्रकारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकाच व्यक्तीचे नाव दोन पत्त्यांवर आढळल्यास अशी दुबार नाव असलेली व्यक्ती त्यापैकी कुठल्या पत्त्यावर असलेल्या नावांवर मतदान करेल याबाबत‍ विकल्प अर्थात हमी पत्र भरुन घेण्यात आले आहे.

     नवी मुंबई महानगरपालिकेने मा. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबध्दरित्या केली आहे

0000

 

संबंधित पोस्ट

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला.

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..