vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामस्थळी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करणेविषयी नोटीस..

सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामस्थळी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करणेविषयी नोटीस..

नवी मुंबई प्रतिनिधी-

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली रहावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यामधील एक महत्वाची बाब म्हणजे महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.

          याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरीता अवलंबवायची “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure (SOP)”) जाहीर करण्यात आली असून बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाबाबतच्या दंडात्मक कारवाईबाबत दि.०१/०८/२०२४ रोजी परिपत्रक पारीत करण्यात आले आहे. तसेच, उपरोक्त ध्वनी व वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत मा. उच्च न्यायालयाने दि.२८/११/२०२५ रोजी आदेश पारीत केलेले आहेत.

          त्यानुसार आयुक्त महोदयांनी नमुंमपा क्षेत्रातील विकासक व वास्तुविशारद यांची विशेष बैठक घेऊन त्यांनी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करावे असे सूचित केले होते. तथापि तुर्भे विभागाचा पाहणी दौरा करीत असतांना जुईनगर रेल्वे स्टेशनलगतचा भूखंड, सेक्टर ११, सानपाडा येथे सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या साईटवर बांधकाम सुरु असतांना वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी संदर्भिय मानक कार्यप्रणालीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशाच प्रकारे भूखंड क्र.१, सेक्टर १९, वाशी येथेही सिडकोमार्फत सुरु असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणीही मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन होत असल्याचे निर्देशनास आले आहे.

          त्यास अनुसरुन सदर भूखंडांवर वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मानक कार्यप्रणालीनुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या उपाययोजनांचा अहवाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागास ७ दिवसांच्या आत सादर करावा अशी नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर न केल्यास बांधकाम स्थगितीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असेही नोटीसीमध्ये सूचित करण्यात आले आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हवा गुणवत्ता राखण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

vishwatmaklokswamivarta

कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी मराठी, तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये शासकीय योजंनाची माहिती देणाऱ्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

रितसर परवानगी घेऊनच जाहिराती प्रसिध्दीचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

मुंबईत धारावी रामरवाडी तील घटना-  एका बेकायदेशीर बांधकामाचे भिंत कोसळून:2 कामगार  गंभीर जखमी सायन रुग्णालयात दाखल, महानगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

vishwatmaklokswamivarta