vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

        अमरावती, प्रतिनिधी : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सन 2025-26 या वर्षासाठी ‘पारधी पॅकेज’ अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या फक्त पारधी आणि फासे पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

     पारधी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पाच मुख्य योजनांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट घेण्यासाठी अर्थसहाय्य. स्वयंरोजगारासाठी ऑटो रिक्षा खरेदीकरिता मदत, संगणक व झेरॉक्स मशीन खरेदी करून तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य, पारधी समाजातील बचतगटांसाठी ट्रॅक्टर खरेदीची सुविधा, गरजू लाभार्थ्यांना व्यवसायासाठी ई-खटला खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे.

    लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विविध तालुकानिहाय अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यासाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती कार्यालय, मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यासाठी उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असतील.

      प्राप्त अर्जांची संगणकीय यादी तयार करून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांची निवड ‘ईश्वर चिठ्ठी’ पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.     याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील विकास शाखा किंवा दुरध्वनी क्रमांक 07226-224217 यावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24×7 तास कार्यान्वित ठेवा

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026-मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रंगीत तालीम..

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..