vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रितसर परवानगी घेऊनच जाहिराती प्रसिध्दीचे आवाहन*

*रितसर परवानगी घेऊनच जाहिराती प्रसिध्दीचे आवाहन*

 

         नवी मुंबई प्रतिनिधी-  महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील दिनांक 09 मे, 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र महानगरपालिका [आकाश-चिन्हे (स्काय-साईन) जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण] नियम, 2022 बृहन्मुंबई महापालिका वगळून सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांना लागू करण्यात आलेले आहेत.महापालिका क्षेत्रात कोणतीही जाहिरात प्रसिध्द करावयाची असल्यास, त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका [आकाश-चिन्हे (स्काय-साईन) जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण] नियम-2022 नुसार मा. महापालिका आयुक्त यांची आगाऊ लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

  जाहिरात म्हणजे कोणतीही खाजगी/ सार्वजनिक / राज्य सरकार / केंद्र सरकार / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / शासकीय कंपन्या / शासकीय प्राधिकरणे इत्यादींची जमीन/इमारतीच्या सभोवतालच्या जागा / गच्ची / प्रकारावर / बांधकामे यावर कोणतीही साधने किंवा कोणत्याही रीतीने मांडलेले जसे, उद्घोषणा किंवा निर्देश, हे जसे की, शब्द, अक्षर, नमूना (Model), भित्ती पत्रके, जाहिरात फलक, कापडी-फलक, तात्पुरत्या कमानी, प्रकाशित चिन्हे, नामफलक, दिशादर्शक फलक, आकाशचिन्ह, प्लाकार्ड, डिजिटल बोर्ड, एलईडी, एलसीडी, बॅकलिट बोर्ड, निऑन बोर्ड डिसप्ले, ईलेक्ट्रॉनिक डिसप्ले, व्हिडीयो डिसप्ले, लेझर शो / देखावा, फूगे इत्यादी ह्यामधील कोणत्याही प्रकारच्या साधनांनी, किंवा माध्यमांद्वारे ग्राहकांना आकर्षित करुन किंवा माहिती देऊन व्यावसायिक फायद्याकरिता किंवा प्रसिध्दीकरिता, कोणत्याही रस्त्यावरुन, मार्गावरुन दिसेल अशा रीतीने मांडलेले निवेदन किंवा प्रदर्शित केलेली कोणतीही कृती यांचा त्यात समावेश होतो. अशा जाहिराती प्रदर्शित करण्याकरीता उक्त नियमातील तरतूदीनुसार कागदपत्रांच्या पुर्ततेसह आवश्यक जाहिरात शुल्काचा भरणा करून नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेणे संबंधित जाहिरातदार यांना बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रदर्शित करण्याकरीता महाराष्ट्र महानगरपालिका [आकाश-चिन्हे (स्काय-साईन) जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण] नियम, 2022 मध्ये अंतर्भुत तरतूदींनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://nmmc.gov.in/navimumbai या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने विहीत कागदपत्रांच्या पुर्ततेसह अर्ज करावा व तद्नंतर आवश्यक जाहिरात शुल्काचा भरणा करून जाहिरात परवाना प्राप्त करून घ्यावा. नवी मुंबई महानगरपालिकेचा जाहिरात परवाना न घेता जाहिरात प्रदर्शित केल्याचे निदर्शनास आल्यास उक्त नियमातील तरतूदी क्र.3(3)(ख)(6) नुसार कोणतीही सुचना दिल्याशिवाय महानगरपालिकेमार्फत सदर जाहिरात फलक निष्कासीत करण्यात येईल व संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta

16 सप्टेंबर रोजी जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी आंबा, काजू, व केळी या फळपिकांसाठी विमा योजना पोर्टल असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री.अंकुश माने 

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी

पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 10 मार्चपर्यंत अर्जाची मुदत..

vishwatmaklokswamivarta