vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

 

जालना, प्रतिनिधी:- बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर,जिल्हा अग्रणी बँक व आर्थिक साक्षरता केंद्र तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दानापुरच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत नईम मोईन शेख यांना विमा रक्कमचे वितरण प्रबंधक विवेक नाचणे यांच्या हस्ते करण्यात आले.”या योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा योजना आवश्यक आहे, तरी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवेक नाचणे यांनी केले आहे.

 जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत गरीब गरजू कुटुंबास आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून, भविष्यातही गरजू नागरिकांसाठी या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय बँकांकडून करण्यात येत आहे.

    18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे.वार्षिक फक्त 436 रुपयांच्या प्रीमियममध्ये 2 लाखांचा विमा संरक्षण मिळतो.मृत्यूनंतर कुटुंबियांना थेट आर्थिक मदत दिली जाते. असा या योजनेचा फायदा होतो.या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, दानापूर शाखेचे व्यवस्थापक राहुल भिलाणे, वित्तीय साक्षरता अधिकारी कैलास तावडे उपस्थित होते. लाभार्थ्यांनी यावेळी सरकारच्या योजनेंबद्दल समाधान व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल