vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन*

*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अल्पमुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांनी आपली https://tinyurl.com/2s3zy24p या लिंकवर आपली माहिती भरावी.

सदर प्रशिक्षण हे मागणी आधारित स्वरूपाचे असून उद्योगांना आवश्यक असलेली प्रगत व आधुनिक कौशल्ये उमेदवारांना प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींची रोजगार व स्वयंरोजगाराची क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, एस. टी. स्टॅण्डजवळ, सातारा दूरध्वनी: (०२१६२) २३९९३८ / ८३०८३८३६३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

vishwatmaklokswamivarta

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे बुधवारी (दि.१०)विशेष ग्राहक जनजागृती कार्यशाळा

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद*

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामावून घेतलेल्या वस्तीशाळा शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे