vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २०२६ पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील राजकीय कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली असून हे निर्बंध २१ एप्रिल सायंकाळी ६ वाजल्यापासून २४ एप्रिलपर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

मतदारसंघात मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण अबाधित राहावे यासाठी प्रचार संपल्यानंतर बाहेरील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मिरवणूक व प्रचार पथकातील सदस्य यांना तत्काळ मतदारसंघ सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रशासनाकडून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कल्याण मंडप, मंगल कार्यालये व सामुदायिक सभागृहांची तपासणी करून बाहेरील व्यक्तींचा निवास आहे का याची पडताळणी केली जाईल. तसेच निवासगृह व अतिथिगृहांमधील राहणाऱ्यांची नोंद तपासली जाईल.याशिवाय मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारून बाहेरील वाहनांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्रांची तपासणी करून ते मतदार आहेत की नाही याची खात्री केली जाईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.0

000

संबंधित पोस्ट

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

मुंबई कांदिवली येथील ग्रॉवेल्स १०१ मॉल’  तत्काळ बंद करा;  मुंबई हायकोर्टाचा एमपीसीबीला आदेश

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी राज्य शासन व ‘आयआयटी’ बॉम्बेमध्ये सामंजस्य करार

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग