vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

 

राज्य प्रतिनिधी

नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, नियोजित साधूग्राम, नागरिकांची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजित आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

सन २०२७-२८ या वर्षात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजनासंदर्भात मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभाग-१ चे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, नगरविकास विभाग-२ चे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोंविदराज, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते

सौनिक म्हणाल्या की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सोयीसुविधांची कामे, साधूग्राममध्ये साधू-महंताची निवासव्यवस्था, वाहनतळ उभारणे, नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, परिसर सुशोभीकरण, गोदावरी नदी आणि उपनद्या संवर्धन, शुद्धीकरण व सुशोभीकरण, ग्रीन झोन, गर्दीचे सनियंत्रण, आरोग्य तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर अनुषंगिक कामे याबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर बैठका घेऊन कामे अंतिम करून त्याचा आराखडा राज्यस्तरावर सादर करावा.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरील कामांचा आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीत बैठका आयोजित केल्या जाव्यात, सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करावे, या कामांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, जेणेकरून नियोजित कामांमध्ये आवश्यक तिथे सुधारणा करण्यासाठी मदत होईल, अशा सूचनाही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

यावेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले.

संबंधित पोस्ट

जिजामाता महाविद्यालयात ड्रोन प्रात्यक्षिक-जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांचा संयुक्त उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिनं रचला नवा इतिहास. 

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार-गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर*धारणी पोलीस स्टेशनला भेट*अभ्यासिकेत पुस्तकांचे वाटप

नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..