vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे-ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार..

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे-ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार..

 

मुंबई, प्रतिनिधी : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सचिन कांबळे-पाटील, श्री. गोरे यांच्या पत्नी सानिया गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासविषयक विविध संकल्पना राबवून विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून राज्याला प्रथमच २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून कामे चालू करण्यात येतील. तसेच प्रधानमंत्री यांची महत्वाकांक्षी लखपती दीदी योजना १०० दिवसात राबविण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दीदी करणार असल्याचेही श्री. गोरे यांनी सांगितले.0000

संबंधित पोस्ट

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

vishwatmaklokswamivarta

मातोश्री मुलींचे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सक्षम आधार

जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय

तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली साताऱ्याच्या अभिमान!