vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्यायाच्या दारात उपोषण, प्रशासनाच्या दारात कुलूप!सहा दिवसांचा जीवघेणा लढा; जयश्री कटके अढळ…अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघडी…

न्यायाच्या दारात उपोषण, प्रशासनाच्या दारात कुलूप!सहा दिवसांचा जीवघेणा लढा; जयश्री कटके अढळ…अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघडी…

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरात न्यायासाठी सुरू असलेला एकट्या महिलेचा संघर्ष आता व्यवस्थेच्या संवेदनाहीनतेचे प्रतीक ठरू लागला आहे. सौ. जयश्री संजय कटके या आपल्या मालकीच्या जमिनीवरील हक्कासाठी सहाव्या दिवसापासून आमरण उपोषणावर ठाम आहेत. पण प्रशासनाने या लढ्याकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. प्रश्न इतकाच न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी आता रस्त्यावर जीव पणाला लावायचा का?न.भू.क्र. 10573 या जागेवर जबरदस्ती अतिक्रमण, गेट तोडफोड, नासधूस आणि बेकायदेशीर ताबा घेण्याचे गंभीर आरोप कटके यांनी केले आहेत. त्याहून धक्कादायक म्हणजे, जागा रिकामी करण्यासाठी तब्बल 50 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे. न्यायालयीन वाद सुरू असतानाही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत माजवत असल्याने कायद्याची भीती उरली आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

 लोखंडी रॉड घेऊन जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न, जाळून टाकण्याच्या धमक्या आणि सततचा छळ या सर्वांनंतरही प्रशासनाची भूमिका संशयास्पद शांततेतच अडकलेली दिसते. पोलिसांना वारंवार माहिती देऊनही ठोस कारवाई न झाल्याने संताप उसळला आहे. आम्ही काही करू शकत नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप कटके यांनी केला असून, त्यामुळे प्रशासनाची जबाबदारीच प्रश्नचिन्हाखाली आली आहे. दरम्यान, उपोषणाचा सहावा दिवस उलटून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. तरीही प्रशासनाचा एकही अधिकारी भेट देत नाही, ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे. आता उपोषण रस्त्यालगत पेंडॉल उभारून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

कटके यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, उपोषणादरम्यान काहीही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील. हा इशारा केवळ भावनिक नाही, तर व्यवस्थेच्या अपयशावर दिलेला कठोर ठपका आहे. न्यायालयात लढा सुरू, रस्त्यावर उपोषण सुरू… पण प्रशासन कुठे आहे? वेळ निघून चालली आहे. आता निर्णय प्रशासनाला घ्यायचाच आहे. न्याय द्यायचा की मौन राखायचे हे कळायला मार्ग उरला नाही. या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज ॲड. दीपक नाईक पाहत असून, कायदेशीर लढा सुरू असतानाही प्रत्यक्षात मात्र कटके यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी  15631 जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध, मंत्रिमंडळानं 12 ऑगस्टच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…