vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी१५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी१५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.  इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण या कार्यालयाशी संपर्क साधावा.000

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

नव्या मुंबईत विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर…

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!

स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न* *ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta