vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाभव्य आणि मजबूत असावा- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाभव्य आणि मजबूत असावा- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

राज्य प्रतिनिधी: मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये श्री. राणे बोलत होते.   मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले की, पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुतळ्याची सर्व कामे व्यवस्थित आणि मजबूत व्हावीत यासाठी दक्षता घ्यावी. पुतळ्याच्या रचनेचा विचार करुन त्याच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्याची विंड टनेल टेस्ट चांगल्या प्रकारे करण्यात यावी. पुतळ्याच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या पुतळा उभारणीच्या कामामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणा, सल्लागार व ठेकेदार यांना समन्वयाबाबत सूचित करण्यात यावे.  यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संगणकीय सादरीकरणाद्वारे पुतळ्याच्या कामाची माहिती देण्यात आली. या पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. 60 फूट उंचीचा हा पुतळा संपूर्ण ब्रॉन्झमध्ये तयार करण्यात येणार आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे. या पुतळ्याच्या कामासाठी 31 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून राजकोट येथील जागेवर पायाचे काम व चबुतऱ्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.       यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे यांनी देवगड येथे उभारण्यात येत असलेल्या मत्स्य महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला. मत्स्य महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या तीन जागा देवगड येथे असून महाविद्यालयाच्या अधिकारी यांनी त्या जागांचे सर्वेक्षण करून त्याविषयी सविस्तर प्रस्ताव द्यावा, हे मत्स्य महाविद्यालय, कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीशी संलग्न असावे, महाविद्यालयाचे काम दर्जेदार करावे, तसेच पालघर येथील महाविद्यालयाच्या कामाचाही पाठपुरावा करण्यात यावा अशा सूचना श्री. राणे यांनी यावेळी दिल्या.0000

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम- महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार..

vishwatmaklokswamivarta

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग,विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी …

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी किशन जावळे*

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर