vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.९ सप्टेंबर २०२५ पर्यंतच्याकालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३(१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली…

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानेअपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस