vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

रायगड प्रतिनिधी: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांचे अधिनस्त मागास वर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अलिबाग, मागास वर्गीय व आर्थिक दृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अलिबाग, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह महाड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तळा, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पनवेल,मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पाली अशी एकूण 7 शासकीय वसतिगृह कार्यरत असून इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहात गरीब, हुशार,होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. दि.10 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार अनु.जाती 85 टक्के अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती 05 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 02 टक्के, आर्थिकदृष्टया मागास 5 टक्के याप्रमाणे आरक्षण आहे.

वसतिगृह वैशिष्टये-मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वहया, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशिततांकरिता लेखन साहित्या करिता रु.4000/- शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.600/-निर्वाह भत्ता जिल्हा पातळीवर व रु.500/-निर्वाह भत्ता तालुका पातळीवर, शालेय/महा.शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेष भत्ता,प्रोजेक्ट रिपोर्ट/शै.सहलभत्ता,अॅप्रनभत्ता इ.

आवश्यक कागदपत्र:-.प्रवेशपात्र विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्वमार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु.जाती, व जमाती विद्यार्थ्यांकरिता रु.2,50,000/-चे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.1,50,000/- चे आंतअसावे, अर्जासोबत तहसिलदार यांचे सहीचा सन 2024-25मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, बँक खात्याची झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

वसतिगृहात राहाणाऱ्या मुला-मुलींकरिता इ. 8 वी पासून पुढे मांग, भंगी, कातकरी व माडिया गोंडया जाती मधील मुलामुलींकरिता इ.5 वी पासून देण्यात येतो. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहातवरील पत्यावर विनामूल्य उपलब्ध आहेत.

अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग या कार्यालयाशी अथवा संबधित गृहपालांशी संपर्क साधावा.

००००००

संबंधित पोस्ट

मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीअल्पसंख्यांक उमेदवाराकडून अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला मराठी भाषेचा गौरव

vishwatmaklokswamivarta

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा…

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….