vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बेस्ट प्रशासनाचा गलथान कारभार- प्रवाशांसाठी धारावी काळा किल्ला आगार ते नेहरूनगर कुर्ला बस सेवेस नकार

बेस्ट प्रशासनाचा गलथान कारभार- प्रवाशांसाठी धारावी काळा किल्ला आगार ते नेहरूनगर कुर्ला बस सेवेस नकार

[ मुंबई प्रतिनिधी- मुंबईकरांच्या बीएसटी बस सेवेचे सेवा पुरवण्यासच नकार बीएसटी बसेस मोडकळीस आल्याचे कारण सांगून धारावी काळा किल्ला ते कुर्ला नेहरूनगर बस डेपोपर्यंत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर प्रयत्न करत असताना प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्राने समोर आले गलथान कारभाराचे वृत्त

सात ऑगस्ट हा बेस्ट चा वर्धापन दिन त्यादिवशी धारावी काळा किल्ला आगारते नेहरूनगर बस डेपो कुर्ला या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची दिनांक 13 जून 2025 रोजी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव दिलीप गाडेकर व गिरीराज शेरखाने यांनी काळा किल्ला बस आगार व्यवस्थापकाकडे केलेल्या मागणीवर बेस्ट दिनी 7 ऑगस्ट रोजी बेस्ट बस गाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे बस गाड्या निष्काशीत होत असल्याचे कारण दाखवून धारावी काळा किल्ला बस आगार ते नेहरूनगर बस डेपो कुर्ला या मार्गावर नवीन बस सेवा सुरू करणे शक्य होणार नाही असं नकार पण भविष्यात बेस्टच्या ताफ्यात नवीन गाड्या उपलब्ध झाल्यानंतर आपल्या मागणीचा सूचनेचा पुनर्विचार करण्यात येईल असे लेखी पत्र दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी आगार व्यवस्थापक काळा किल्ला डेपो यांच्याकडून प्राप्त झाले म्हणजेच आणखी किती वाट बघायला लावणार आहात असा प्रश्न धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव श्री दिलीप गाडेकर यांनी आजच्या बेस्ट वर्धापन दिनी बेस्ट प्रशासनाला विचारला आहे यामुळे धारावीकर आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश पसरलेला आहे एकीकडे सायन स्टेशन कडे असणारा वाहतुकीचा मार्ग बंद असल्याने वरिष्ठ नागरिक आणि महिला मुले यांना दहा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच अशा बीएसटीच्या उत्तराने नागरिकांमध्ये आक्रोश पसरलेला आहे

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन ! कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta