vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

रायगड( प्रतिनिधी:-पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात आहेत. तसेच या संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्या असून याबाबत आपल्या जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधून बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नयना अर्जुन गुंडे, आयुक्त (भा.प्र.से) महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्ष कारावास तसेच रुपये 1.00 लक्ष पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतुद नमूद करण्यात आले आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना”ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधारसांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया;पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

जी.डी.सी. अण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षेचा अर्ज भरण्यास 17 मार्चपर्यंत मुदतवाढ..

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

बीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, 51 हजाराचे बक्षीस- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत