vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला

राज्य प्रतिनिधी-अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी आज गढवाल रायफल्स रेजिमेंटचे 23 वे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला. यानिमित्ताने भारतीय सेनेच्या गौरवशाली परंपरा आणि भावनांचे प्रतिबिंब असलेल्या एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दिनेश सिंग राणा यांनी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांच्याकडून हा पदभार स्वीकारला.

उत्तराखंडमधील लान्सडाऊन इथे गढवाल रायफल्सच्या रेजिमेंटल केंद्रात पूर्ण लष्करी सन्मानासह पदभार हस्तांतरणाचा औपचारिक समारंभ पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने भारतीय सेनेच्या सर्वात प्रतिष्ठित पायदळ तुकड्यांपैकी एक आणि एका स्काउट्स बटालियनसह 27 बटालियनचा अंतर्भाव असलेल्या गढवाल रायफल्सची गौरवशाली वंशपरंपरा, शौर्य आणि दीर्घकालीन वारशाचा सोहळा साजरा केला गेला.

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटच्या कर्नल पदाच्या आपल्या कार्यकाळात अनुकरणीय नेतृत्वाचे दर्शन घडवले. त्यांनी या रेजिमेंट मधील परस्पर बंध अधिक घट्ट केले. सर्वोच्च व्यावसायिकता आणि परस्पर सहकार्य भावनेची प्रचिती देणारे सौहार्द ही गढवाल रायफल्सची ओळख त्यांनी निष्ठेने जपली.

कुशल नेतृत्वगुण असलेले लेफ्टनंट जनरल डी. एस. राणा, एक सन्मानित अधिकारी असून, या क्षेत्राचा दांडगा अनुभव आणि द्रष्टे रणनैतिक नियोजन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्वाचे पैलू आहेत. या रेजिमेंटचे 23 वे कर्नल म्हणून पदभार स्वीकारताच त्यांनी राष्ट्रसेवेत कायमच अढळपणे उभ्या राहिलेल्या ‘वीर गढवाली’ योद्ध्यांची मूल्ये, शिस्त आणि लष्करी परंपरेचा वारसा पुढे नेण्याप्रति आपली ठाम वचनबद्धता अधोरेखित केली.

या समारंभाचा एक भाग म्हणून, लेफ्टनंट जनरल डी. एस. राणा यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्वीकारला, त्यांनी युद्ध स्मारकावर आदरांजली वाहून रेजिमेंटच्या शूरवीरांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान केला.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..

पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप

शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

बालसाहित्याकडे द्या विशेष लक्ष;जिल्हाधिकाऱ्यांची साहित्यिकांना सादभरपूर वाचनानंतरच लेखनाकडे वळावे: संमेलनाध्यक्ष डॉ. विशाल तायडे

vishwatmaklokswamivarta