vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

इ टी एज एससीएम फेस्ट 2025: ‘संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ ने आयडब्ल्यूएआयच्या जल मार्ग विकास प्रकल्पाला गौरव

इ टी एज एससीएम फेस्ट 2025: ‘संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ ने आयडब्ल्यूएआयच्या जल मार्ग विकास प्रकल्पाला गौरव..

व्यावसायिक प्रतिनिधी-26-27 जून रोजी नवी दिल्ली येथे आयोजित इ टी एज सप्लाय चेन मॅनेजमेंट फेस्ट -2025 मध्ये बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाला (आयडब्ल्यूएआय) ‘संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान आयडब्ल्यूएआयच्या जल मार्ग विकास प्रकल्प (जेएमव्हीपी ) अंमलबजावणीसाठी देण्यात आला.हा प्रकल्प राष्ट्रीय जलमार्ग -1 (गंगा नदी) च्या जलवाहतूक क्षमतेत वाढ करण्यासाठी राबवला जात असून, तो 1390 किलोमीटर लांब पसरलेल्या नदीच्या प्रवाहात कार्यरत आहे. हा मार्ग उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून ते पश्चिम बंगालमधील हल्दियापर्यंत असून झारखंड व बिहार या राज्यांमधून जातो.

जेएमव्हीपी अंतर्गत मल्टी-मोडल आणि इंटर-मोडल टर्मिनल्स, नेव्हिगेशनल लॉक, कम्युनिटी जेटीज आणि जलमार्ग देखभाल कामे या राष्ट्रीय जलमार्ग -1 च्या 9 भागांमध्ये आयडू्ल्यूएआय मार्फत राबवण्यात येत आहेत. हा प्रकल्प जागतिक बँकेच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने राबवला जात आहे.संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ हा पुरस्कार आयडब्ल्यूएआयच्या देशातील आंतरदेशीय जलवाहतूक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय पायाभूत कामगिरीचे प्रमाणपत्र आहे.

जल मार्ग विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर राष्ट्रीय जलमार्ग -1 वरील मालवाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी जिथे प्रति वर्ष 5 एमएमटी मालवाहतूक होत होती, ती आता 16 एमएमटी पेक्षा अधिक झाली आहे

राष्ट्रीय जलमार्ग -1 हा आयडू्ल्यूएआयच्या जलवाहक कार्गो प्रोत्साहन योजनेंतर्गत एक प्रमुख जलमार्ग आहे. यामघ्ये मालवाहतूक जलमार्गाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या योजनेंतर्गत नियोजित सेवा कोलकाता ते पाटणा आणि कोलकाता ते वाराणसी या मार्गांवर सध्या सुरू आहेत.याशिवाय, जगातील सर्वात लांब क्रूझ ‘गंगा विलास’ च्या यशामुळे गंगा नदीवर जलपर्यटनाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

पुढील काही वर्षांत आयडब्ल्यूएआयचा क्रूझ टर्मिनल्स, फ्रेट व्हिलेजेस आणि जहाज दुरुस्ती केंद्रे विकसित करण्याचा मानस आहे, जेणेकरून राष्ट्रीय जलमार्ग -1 वर शाश्वत मालवाहतूक आणि जलपर्यटन अधिक प्रोत्साहित करता येईल.

एससीएम फेस्ट – 2025 मध्ये जेएमव्हीपीचे मुख्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक अरुण कुमार मिश्रा यांनी आयडब्ल्यूएआयच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

संबंधित पोस्ट

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत

व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा- रुपाली चाकणकर ००खरे हिरो ‘राष्ट्रपुरुष’ … रिलस्टार्स नव्हे-अमोल सातोडकर

vishwatmaklokswamivarta

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा;आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला गती;जिल्ह्यात 423 तरुणांच्या उद्योगांना बँकेचे बळ

अमृत आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta