vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सवांचे विशेष महत्व आहे, मकरसंक्रांतीचेही भौगोलिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. या सणानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांच्या एकत्र येण्यातून विचारांचे आदान प्रदान होते. त्यातून प्रेम-आपुलकीचे नाते वृद्धिंगत होते. संवाद हरवलेल्या या काळात या माध्यमातून संवाद व संस्कार वृद्धिंगत व्हावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये महिलांसाठी हळदीकुंकवांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ.सुचिता शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिंमद्रे, जिल्हा परिषदच्या जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विधीज्ञ ॲड.रेणुका घुले, डॉ.सविता मुळे व सायबर सेलचे धनंजय सानप उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की जिल्ह्यामध्ये मुलीचा जन्मदर वाढवणे, महिला सुरक्षितता त्याचप्रमाणे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन करत आहे. महिलांच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी पालकांबरोबरच शासनातील विविध विभागातील काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी महिलांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले.

मार्गदर्शक डॉ.सविता मुळे यांनी सांगितले की,भारतीय संस्कृतीचे अद्वितीय महत्त्व आपल्या जीवनात आहे. माणसाने मीपणा किंवा अहंभाव सोडून वागलं पाहिजे, यामुळे समाजातील विविध समस्या निर्माण होणार नाहीत. कीर्तनाच्या माध्यमातून विविध संतांच्या ओव्याचा दाखला देत त्यांनी ही सुखी आणि समाधानी कुटुंब आणि सुखी जीवन करण्यासाठी अहंकार विरहित जीवनपद्धती अंगीकरण्या संदर्भात मार्गदर्शन केले .

सायबर सेलचे धनंजय सानप यांनी सांगितले की, महिलांनी कोणत्याही समाज माध्यमाचा वापर काळजीपूर्वक करावा,यामध्ये फोटो स्टेटस, विविध एपीके फाइल्स यासंदर्भातला कोणत्याही लिंक किंवा संकेतस्थळाला भेट देत असताना खातरजमा करावी. त्याचप्रमाणे फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या माध्यमातून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट ह्या तपासूनच स्वीकार करावा. फसव्या फोन कॉल्स ला उत्तर न देता, आपली खाजगी, वैयक्तिक माहिती कोणत्याही समाज माध्यमावर प्रदर्शित करू नये जेणेकरून आपल्या खाजगी आणि सामजिक जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो. समाज माध्यमांचा वापर करत असताना काळजीपूर्वक वापर आणि नियंत्रित वापर असावा असे यावेळी यांनी सांगितले.

  ॲड. रेणुका घुले यांनी सांगितले की. महिलांसाठी विविध कायदे असून या कायद्याद्वारे महिलांना सुरक्षिता आणि संरक्षण त्याचप्रमाणे निर्भय वातावरणात जगण्याचा हक्क प्राप्त होतो. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचे अंमलबजावणी होत असताना कोणालाही त्रास होईल अशा हेतूने तक्रार महिलेने करू नये. तसेच अन्याय सहन ही करू नये, या कायद्याचा सुयोग्य वापर करून महिलांना सुरक्षित वातावरण,कुटुंबात आणि समाजात मिळावे यासाठी याचा वापर व्हावा.    सुत्रसंचालन रोहीणी माळी यांनी तर आभार प्रदर्शन संगिता राठोड यांनी केले.०००००

संबंधित पोस्ट

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल· नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम गडचिरोलीत लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta

14 जानेवारी रोजी कोकण विभागीय-पेन्शन अदालत