vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

*तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

 

मुंबई प्रतिनिधी-

काँग्रेसने काश्मिरमध्ये संविधान लागु केले असते तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता.कलम 370 हटवीले यामुळे काश्मिरचा विकास झपाट्याने होत अहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

फुलंब्री तालुक्यातील आदर्शगाव किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार अनुराधा अतुल चव्हाण ह्या होत्या.किनगाव चे सुपुत्र अतुल चव्हाण; रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम ; मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके ; विजय मगरे; राजू प्रधान भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ सरपंच मनीष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.सुत्रसंचालन कल्याण चव्हाण यांनी केले

 डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांच्या संविधानामुळे मी केंद्रात आहे.मोदी-शहा यांनी कलम 370 हटवून काश्मिर मधील आतंक संपवला.तेथे विकासचे पर्व सुरु झाले.370 कलम हटविल्यापासुन अडीच कोटी पर्यटकांनी पर्यटन केले.यामुळे रोजगार व व्यवसाय वाढला.कधी रस्ते माहित नव्हते रस्ते पुर्ण झाले.यामुळे काश्मिरी जनता खुश आहे.आमदार अनुराधा चव्हाण,बाबुराव कदम,सुहास शिरसाठ यांची भाषणे झाली.यावेळी पुर्णाकृती पुतळ्यासाठी जागा दान करणाऱ्या मंजाबाई साळवे यांच्या मुलाचा सत्कार आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आर पी आय चे तालुका अध्यक्ष राजु प्रधान,मिलिंद शेळके,विजय मगरे,संजय ठोकळ,शिवाजीराव पाथीकर,जितेंद्र जैस्ववाल,सुचित बोरसे,भाजपा शहर अध्यक्ष योगेश मिसाळ,सरपंच मनिषा अनिल चव्हाण,उपसरपंच किशार चव्हाण,बाळासाहेब शिंदे यांची उपस्थीती होती.

000000

संबंधित पोस्ट

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प   – राज्यपाल जिष्णू देव वर्माखारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ .

प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार डिजीटल इंडिया सेवा केंद्र-केंद्र शासनाचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम-   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ⁠तीन महिन्यात 13 हजार पट्टेवाटप करणार..

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*

महाज्योती’ची ऑनलाईन प्रशिक्षण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर  – मंत्री अतुल सावेजेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नव्याने अर्ज करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ..

महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होणार नाही – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर