vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

एक भारतीय मुलगा… त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री कोण ? फोटो संपूर्ण जगभर व्हायरल होऊ लागला…

एक भारतीय मुलगा… त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री कोण ? फोटो संपूर्ण जगभर व्हायरल होऊ लागला…

विशेष प्रतिनिधी-

जर्मनीतील एका मेट्रोमध्ये बसलेला, थकलेला, गोंधळलेला आणि हरवलेला वाटणारा एक भारतीय मुलगा… त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री कोण आहे, हे त्याला मुळीच ठाऊक नव्हते. पण क्षणात या दोघांचा फोटो संपूर्ण जर्मनीभर व्हायरल होऊ लागला.

जर्मनीतील प्रतिष्ठित मासिक “डेर स्पीगल” यांनी त्या फोटोतील भारतीय मुलाचा शोध सुरू केला. अनेक दिवसांच्या शोधानंतर तो मुलगा म्यूनिखमध्ये सापडला… आणि त्याबद्दल धक्कादायक माहिती मिळाली—तो जर्मनीत बेकायदेशीररित्या राहात होता.

पत्रकाराने त्याला विचारलं,”तुला माहिती आहे का, तुझ्या शेजारी बसलेली गोरी मुलगी म्हणजे ‘मॅसी विलियम्स’—गेम ऑफ थ्रोन्सची जागतिक स्टार? लाखो चाहते तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्वप्न बघतात, पण तू तर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीस… का?”

मुलगा शांतपणे हसला आणि म्हणाला,

“जेव्हा तुझ्याकडे राहण्याचा परवाना नसतो… खिशात एकही युरो नसतो… आणि रोजची ट्रेनची तिकिटंही तू काढू शकत नाहीस… तेव्हा तुझ्या बाजूला कोण बसलंय, याने काहीच फरक पडत नाही.”

त्याच्या प्रामाणिकपणाने आणि परिस्थितीने प्रभावित होऊन त्या मासिकाने त्याला थेट महिन्याला 800 युरो पगारावर पोस्टमनची नोकरी ऑफर केली. जॉब कॉन्ट्रॅक्ट मिळताच त्याला कायदेशीर राहण्याचा परवाना त्वरित मंजूर झाला… कोणत्याही अडथळ्याशिवाय.

ही कथा आपल्याला एक खोल जाणीव करून देते—

नियतीचे धागे अगदी अदृश्य असतात, पण जोडलेले मात्र असतात. प्रत्येक घटना दुसऱ्या घटनेशी न बोलता जोडलेली असते. आयुष्याची एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि आपण तिच्यातला फक्त एक पात्र आहोत. पुढे काय घडणार… कोणाला काहीच ठाऊक नाही. सदर बातमीही स्टार मराठी या फेसबुक पेजवर वायरल होत आहे विषय भारतीयाचा असल्याने नियतीचा खेळ या बातमीतून दिसून येते सौजन्य

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

मुंबई सीएसटी येथे स्टेशनवर  गोंधळ, दोन लोकल अचानक आमने-सामने, मोटरमन ने रेल्वे थांबवली, थोडक्यात टळला अपघात रेल्वे सेवा विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन· शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून बालकलावंतांचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार; समिती काढणार वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा…

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश,महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –