vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ गाळप हंगामासाठी सज्ज :समृद्धी साखर कारखान्यात 2025-26 हंगामाचे रोलर पूजन

शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ गाळप हंगामासाठी सज्ज :समृद्धी साखर कारखान्यात 2025-26 हंगामाचे रोलर पूजन

घनसावंगी: प्रतिनिधी आगामी गाळप हंगाम 2025-26 साठी समृद्धी साखर कारखाना सज्ज झाला असून, कारखान्याची यंत्रणा सुरु करण्यासाठी कारखान्याचे चेअरमन श्री. सतीश घाटगे आणि व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.३१) पारंपरिक रोलर पूजन कार्यक्रम पार पडला.

 समृद्धी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक दिलीप मामा फलके, संचालक विकी शिंदे यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर आर. एस. माथनकर, विजय पंडित, सुमितकुमार माथुर , विकास खरात, भरत नाईकनवरे तसेच शेतकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समृद्धी साखर कारखाना प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहिला आहे.

यंदाच्या हंगामातही कारखाना क्षेत्रातील उसाचे निर्धारित वेळेत गाळप करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला परंपरेनुसार उच्चांकी दर देण्यासाठी प्रयत्न केले जातील. असा विश्वास कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व्यक्त केला आहे.

———-

फोटो कॅप्शन : गाळप हंगाम 2025-26 साठी रोलर पूजन करताना समृद्धी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक दिलीप फलके, विकी शिंदे, आर. एस. माथनकर, विजय पंडित, सुमितकुमार माथुर , विकास खरात, भरत नाईकनवरे सह आदी. अधिकारी कर्मचारी

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा मित्रांची प्रशिक्षणासाठी निवड होणार-> इच्छुक युवकयुवतींना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके

जनगणना 2027 मधील हाऊस लिस्टिंग विषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ*

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार

सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी…