vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न 

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 रायगड प्रतिनिधी:

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अलिबाग येथे ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या आदेशानुसार आणि डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग आणि लायन्स क्लब, श्रीबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. निशिकांत पाटील यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी डॉ. किरण शिंदे (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. अनंत बिडकर (अधिष्ठाता प्रतिनिधी), डॉ. रवी वरट, डॉ. बंडेवाड, डॉ. प्रवीण कंदाडे, श्री. संजय माने (जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक), अमित पुंडे (जिल्हा युवा अधिकारी), ऍड. निहा अनिस राऊत (संस्थापक), लायन्स क्लब पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.ही स्पर्धा अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून सुरू होऊन काँग्रेस भुवन मार्गे हिराकोट तलाव फेरी करून पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर संपन्न झाली.

स्पर्धेचे प्रमुख विजेते,

मुलांमध्ये –स्वागत समीर पाटील, पी.एन.पी. कॉलेज, वेश्वी अमर भागोजी धुमाने, केईएस डॉ. सी.डी. देशमुख कॉलेज, रोहा अशोक बाळाराम वारगुडे, भाऊसाहेब नेने कॉलेज, पे

मुलींमध्ये – नेहा हेमंत म्हात्रे, जे.एस.एम. कॉलेजअदिती बबन मेंगाळ, भाऊसाहेब नेने कॉलेज, पेण प्रणाली शशिकांत तळेगावकर, पी.एन.पी. कॉलेज, वेश्वी

विजेत्यांना अनुक्रमे ₹२०००, ₹१५०० आणि ₹१००० चे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन डॉ. पाटील, डॉ. शिंदे व डॉ. बिडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.भूमी म्हात्रे आणि पर्णवी मयेकर यांनी लहान वय असूनही स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना ऍड. निहा अनिस राऊत यांच्यातर्फे उत्तेजनार्थ विशेष बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. संजय माने (जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग) यांनी केले

०००0000

संबंधित पोस्ट

तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे. तसेच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,मंत्री आदिती तटकरे

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत प्रतिभा विकास केंद्रात खेळाडूंना आर्चरी व ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय नोंदवला