vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

मुंबई, प्रतिनिधी: आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या बंदराला रस्ता, रेल्वे आणि वायुमार्गाने प्रभावीपणे जोडण्यासाठी समन्वयित पावले उचलली जात आहेत. वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीने जागा निश्चिती करण्यात यावी, तसेच राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

विधिमंडळातील समिती कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या संचालक मंडळाची ९३ वी बैठक पार पडली. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष स्वाती पांडेय, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय सिंघल तसेच मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन विटणकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्हा देशातील महत्त्वपूर्ण स्टील उद्योग केंद्र म्हणून विकसित होत असून, या औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी तेथे लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे वाढती वाहतूक आणि लॉजिस्टिक गरजा लक्षात घेता आधुनिक विमानतळ सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार व आधुनिकीकरणाचा आढावा घेण्यात आला. प्राधिकरणाच्या वतीने राज्यातील नऊ विमानतळांच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

मिहान विकासासाठी ५९७ कोटींची मंजुरी; २९७ कोटी वितरित

मिहान येथे अनेक उद्योग व प्रकल्प कार्यान्वित झाले असून, पतंजली आयुर्वेदचाही प्रकल्प सुरू झाला आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर, कमर्शियल कॉम्प्लेक्स, महाराष्ट्र अॅग्रो डेव्हलपमेंट कंपनी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, सेझबाह्य क्षेत्रातील हेल्थकेअर सुविधा, कार्गो हब आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-व्ही चार्जिंग स्टेशन यांसारख्या प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली.

मिहानच्या सर्वांगीण विकासासाठी ५९७ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २९७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १२ कोटी ३८ लाख रुपये खर्चाचा ३९ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प उभारण्यात येत आहे. शिवणगाव आणि वित्तुबाबानगर परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील विमानतळ व औद्योगिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

00000

संबंधित पोस्ट

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत मृत प्रवाशांना श्रद्धांजली

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप.

vishwatmaklokswamivarta

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम