vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६; सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६; सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

        राज्य प्रतिनिधी सांगली भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक २०२६ साठी गुरूवार दि, १८ जून २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील ५ व सातारा जिल्ह्यातील ७ अशा एकूण १२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

        मतदान केंद्राचे ठिकाण, ज्या इमारतीत मतदान केंद्र असेल ती इमारत आणि ज्या स्थानिक प्राधिकारीचे मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्या प्राधिकारीचे नाव यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे –

सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रे

१) कडेगाव – तहसील कार्यालय, कडेगाव, पात्र मतदार – कडेगाव नगरपंचायत, कडेगाव व पलूस नगरपरिषद, पलूस.

२) विटा – उपविभागीय अधिकारी, खानापूर भाग, विटा यांचे कार्यालय, पात्र मतदार – विटा नगरपरिषद, विटा, खानापूर नगरपंचायत, खानापूर, आटपाडी नगरपंचायत, आटपाडी, तासगाव नगरपरिषद, तासगाव

३) ईश्वरपूर – तहसील कार्यालय, वाळवा, ईश्वरपूर, पात्र मतदार – उरूण ईश्वरपूर नगरपरिषद उरूण ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषद, आष्टा, शिराळा नगरपंचायत, शिराळा.

४) सांगली – अपर तहसील कार्यालय, सांगली, जुना पुरवठा विभाग, पात्र मतदार – जिल्हा परिषद, सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.५) जत – तहसील कार्यालय, जत, पात्र मतदार – जत नगरपरिषद, जत, कवठेमहांकाळ नगरपंचायत, कवठेमहांकाळ.

सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रे

(१) वाई – तहसिल कार्यालय वाई, पात्र मतदार – नगरपरिषद वाई, गिरीस्थान नगरपरिषद महाबळेश्वर, गिरीस्थान नगरपरिषद पाचगणी, नगरपंचायत खंडाळा, नगरपंचायत लोणंद.

(२) फलटण – तहसिल कार्यालय फलटण, पात्र मतदार – नगरपरिषद फलटण.(३) दहिवडी – तहसिल कार्यालय माण, पात्र मतदार – नगरपंचायत दहिवडी, नगरपंचायत वडूज, नगरपरिषद म्हसवड.(४) कोरेगांव – तहसिल कार्यालय कोरेगांव, पात्र मतदार – नगरपंचायत कोरेगांव, नगरपरिषद रहिमतपूर.(५) सातारा – तहसिल कार्यालय सातारा, पात्र मतदार – जिल्हा परिषद सातारा, नगरपरिषद सातारा, नगरपंचायत मेढा.(६) पाटण – तहसिल कार्यालय पाटण, पात्र मतदार – नगरपंचायत पाटण.

(७) कराड – तहसिल कार्यालय कराड, पात्र मतदार – नगरपरिषद कराड, नगरपंचायत मलकापूर

0000

संबंधित पोस्ट

कोयना धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – मंत्री मकरंद जाधव – पाटील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती; मंत्रालयात आढावा बैठक

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण1 फेब्रुवारी 2026 रोजी आपला सलग नववा केंद्रीय बजेट संसदेत सकाळी 11 वाजता सादर करणार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन