vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीत २७ फेब्रुवारी २६ रोजी गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल या ठिकाणी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा

 धारावीत २७ फेब्रुवारी २६ रोजी गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल या ठिकाणी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा

मुंबई प्रतिनिधी -धारावी २७ फेब्रुवारी २६ रोजी गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल या ठिकाणी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापक प्रवीण क्षेत्र सर , विपुल गायकवाड सर , परीक्षक शुभांगी व्हटकर मॅडम ,व ज्योत्स्ना थोरात मॅडम, अर्चना कोळी मॅडम, स्वीटी करनपनोर मॅडम,यांनी आखला होता व तो अत्यंत जबाबदारीने तसेच नेटकेपणाने पार पाडला.

मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम मराठमोळ्या वेशभूषा केलेला विद्यार्थ्यांनी मराठी गौरवपर गीत गायन केले. सौ शुभांगी व्हटकर मॅडम यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले. ज्योत्स्ना थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाने काही विद्यार्थ्यांचे भाषण झाले. तसेच सौ. सोनाली नारायणे यांच्या देखरेखी खाली पाचवी व सहावीच्या मुलांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले, त्यांनी कवितांमधून मराठी भाषेचा गौरव केला स्काऊट अँड गाईड या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे गौरव गीत सादर केले. रेखा दारोळे मॅडम यांच्या घोषवाक्याने मराठी भाषेचा जयजयकार झाला .

सर्व स्पर्धा झाल्यानंतर मराठी राजभाषा दिनाचा प्रचार करण्याकरिता प्रभात फेरी काढण्यात आली.मुख्यध्यापक , शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळून ‘मराठी राजभाषा दिन’ सोहळा पार पाडला

संबंधित पोस्ट

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध-होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट· ‘सिंधुप्रहरी’ कार्यप्रणाची घेतली माहिती· परिवहन विभागानेही केले सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta