vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना

आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना..

मुंबई, प्रतिनिधी: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील सर्व भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचा, आवश्यक ती काळजी घेण्याचा, सतर्क राहण्याचा तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांकडून आणि दूतावासाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सुरक्षा मार्गदर्शक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अबू धाबी येथील भारतीय दूतावास आणि दुबई येथील वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन चौकशीसाठी यूएईमधील भारतीय नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल-फ्री क्रमांक: 800-46342, व्हॉट्सअ‍ॅप: +971543090571, ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.inतेल अवी

सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सर्व वेळ सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी इस्रायली अधिकाऱ्यांकडून आणि होम फ्रंट कमांडकडून जारी करण्यात आलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असा कडक सल्ला देण्यात आला असून अद्ययावत सूचना खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:

https://www.oref.org.il/eng. सर्व भारतीय नागरिकांनी नियुक्त आश्रयस्थळांच्या जवळ राहावे तसेच आपल्या निवासस्थान किंवा कार्यस्थळाजवळील संरक्षित जागांची माहिती करून घ्यावी. पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमधील सर्व अनावश्यक व गैर-आवश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

नागरिकांनी स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन इशारे यांचे नियमितपणे निरीक्षण करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, भारतीय नागरिकांनी तेल अवीव येथील भारतीय दूतावासाशी पुढील २४x७ हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा: दूरध्वनी: +972-54-7520711; +972-54-2428378, ई-मेल: cons1.telaviv@mea.gov.inदोह

कतारमधील सर्व भारतीय नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा तसेच दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या बातम्या व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला असून दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. दूतावासाचा २४x७ हेल्पलाईन क्रमांक: 00974-55647502 असून, कोणत्याही चौकशीसाठी ईमेल: cons.doha@mea.gov.in वर संपर्क साधावा

स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आपत्कालीन सूचनेनुसार, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी लष्करी स्थळांच्या परिसरापासून दूर राहावे आणि घरात किंवा इतर कोणत्याही इमारतीत सुरक्षित राहावे. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये किंवा हालचाल करू नये, जेणेकरून कोणत्याही जोखमीपासून बचाव होईल

प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पॅलेस्टाइनमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची तसेच स्थानिक प्रशासनाकडून सूचित करण्यात आलेल्या सुरक्षा व आपत्कालीन प्रक्रियांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, कृपया पुढील क्रमांक व ईमेलवर संपर्क साधावा:दूरध्वनी: +970592916418, ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

तेहरान,इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, अनावश्यक हालचाली टाळण्याचा आणि शक्य तितक्या घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.भारतीय नागरिकांनी बातम्यांवर लक्ष ठेवावे, परिस्थितीचीबाबत जागरुक रहावे. भारतीय दूतावासाकडून येणाऱ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.

दूतावासाचे आपत्कालीन संपर्क तपशील पुढीलप्रमाणे +989128109115+989128109109,

रियाध,सौदी अरेबियाच्या राज्यात सध्या वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा, सौदी अरेबियामध्ये प्रचलित असलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचा तसेच स्थानिक प्रशासन आणि दूतावासाकडून जारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रियाध येथील भारतीय दूतावास आणि जेद्दा येथील वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत आणि आवश्यकतेनुसार पुढील अद्यतने व सल्ले जारी करतील.

रियाध येथील भारतीय दूतावासाचे २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे: 00-966-11-4884697, 00-966-542126748 (फक्त व्हॉट्सअ‍ॅप), 800 247 1234 (टोल-फ्री), ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा..

vishwatmaklokswamivarta

गुजरात राज्य सरकार शाळांमध्ये पुढील सत्रापासून भगवद्गीता शिकवली जाणार…गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया  यांची ही घोषणा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन