vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा…

राज्य प्रतिनिधी-मुंबई, : पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या (१) टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर हॉस्पिटल, (२) गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केइएम हॉस्पिटल, (३) लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल तसेच (४) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि आर एन कूपर हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबईतील या चार प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते सायं. ४ वाजेपर्यंत समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) ची शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती यासह सेवा दिल्या जाणार आहेत.

याच रुग्णालयांमध्ये सायं. ४ ते सकाळी ९ या वेळेत तणाव, निद्रानाश, अस्वस्थता, घटना पुन्हा अनुभवण्याची भावना यासाठी आपत्कालीन समुपदेशन व औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हिटगुज (HITGUJ) या आत्महत्येच्या प्रतिबंधासाठीच्या ०२२-२४१३१२१२ या दूरध्वनी हेल्पलाइनचा वापर करून सकाळी ९ ते सायं. ४ पर्यंत तज्ज्ञ समुपदेशक मानसिक लक्षणांची तपासणी करतील व आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठवण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :

नायर हॉस्पिटल

डॉ. हेनल शाह (इन्चार्ज) : 9323193505

डॉ.जान्हवी केदारे (युनिट प्रमुख) : 93222 39997

डॉ.अल्का सुब्रमण्यम: 9820143245

केइएम हॉस्पिटल

डॉ.अजित नायक (विभाग प्रमुख) : 98703 14844

डॉ. नीना सावंत (युनिट प्रमुख) : 9930583713

डॉ.क्रांती कदम : 99209 69088

डॉ.शिल्पा आडारकर : 98201 39158

सायन हॉस्पिटल

डॉ.निलेश शाह (विभाग प्रमुख) : 887956453

डॉ.हिना मर्चंट : 9930395679

कूपर हॉस्पिटल

डॉ .देवराज सिन्हा (इन्चार्ज) : 9869989894

संबंधित पोस्ट

विनानंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक #कारवाई,हायवांवर आरटीओकडून ७३ हजार ७५० रुपयांचा दंड ; चालक-मालकांना कडक इशारा#रेती, #मुरुम, मातीची #वाहतूक विनानंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची नागरिकांनी खरेदी करावी _जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.      

विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत आता पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे-अनुदानासाठी पशुपालकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव