vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत जाहीर

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत जाहीर

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासन तर्फे ‘महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत’ १ नोव्हेंबर २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय, वाशी, नवी मुंबई येथे पार पडली.

या सोडतीमधून “जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी” या ब्रिदवाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला आहे. या सोडतीतील पहिले (सामायिक) बक्षीस तिकीट क्रमांक DI-04 47495 हे ठरले असून, रु. १ कोटी चे हे बक्षीस महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर येथील खरेदीदारास प्राप्त झाले आहे.

सोडतीत रु. १,००,०००/- ची ७ बक्षिसे, तसेच रु. १०,०००/- च्या आतील रकमेची ७,४५७ बक्षिसे लागली असून, एकूण बक्षिसांची रक्कम रु. १,४१,६८,९००/- इतकी आहे.

रु. १०,०००/- पेक्षा जास्त रकमेच्या बक्षिसांसाठी खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद प्रक्रियेनुसार अर्ज कार्यालयाकडे सादर करावेत. तर रु. १०,०००/- पर्यंतच्या बक्षिसांसाठी मागणी संबंधित लॉटरी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय, वाशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta

कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करावे- मंत्री अतुल सावे

चिखलदरा महोत्सवात महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करून व्यापकता निर्माण कराव-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री – 2026

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी 

मुंबईतील परळ  येथील स्वामी संस्था विरंगुळा केंद्राला सदिच्छा भेट

सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

vishwatmaklokswamivarta