vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील अनेकांनी भिकन रोजेकर यांचा आदर्श घ्यावा: आमदार नारायण कुचे

जिल्ह्यातील अनेकांनी भिकन रोजेकर यांचा आदर्श घ्यावा: आमदार नारायण कुचे

जालना, (प्रतिनिधी )-कठीण परिस्थितीवर मात करून कसे शिकायचे याच मूर्तिमंत उदाहरण हे जगन रोजेकर हे आहेत. आपल्याला संधी मिळाली की त्याचे सोने करणे हे आपले काम असते. रोजेकर यांना संधी मिळाली आता तिचे सोने करणे त्यांच्या हातात असल्याचे ते म्हणाले. भिकन रोजेकर यांची आई बेबीताई, वडील जगन रोजेकर यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्ह्यातील जळगाव सपकाळ येथे राहणारे भिकन जगन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले यानिमित्त त्यांचा नागरी सत्कार

संयोजन समितीच्या वतीने जालना शहरातील राजाराम नगर भागात असलेल्या संतसावता महाराज सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी व्यासपीठार महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, बाला परदेशी, नगरसेवक अश्विन अंबेकर,दुर्गेश काठोठीवाले, संयोजन समितीचे प्रा.सत्संग मुंढे, शेख महेमूद, विजयकामड,कॉ.सगीर अहेमद रजवी, बाला परदेशी, नगरसेवक अश्विन अंबेकर, देवरावसोनवणे, संजय इंगळे, अ‍ॅड.दशरथ इंगळे, राहुल देशमुख, अमोल खरात, ईश्वरगाडेकर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.नारायण कुचे म्हणाले की,भिकन रोजेकर यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश हे सर्वांनाच अभिमानवाटावे असे आहे. त्यांचा आदर्श घेऊन अनेक रोजेकर जिल्यात निर्माणव्हावेत. माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांचेही कौतुक आ.कुचे यांनीकेले. ते म्हणाले की, अनेक वेळा माणसांमध्ये योग्यता असूनही संधी मिळत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे या व्यासपीठावर बसलेले माजी नगराध्यक्षभास्करराव अंबेकर हे आहेत. अत्यंत चांगला स्वभाव, दांडगा जनसंपर्क, मोठा अनुभव गाठीशी असूनही त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे खूप चांगलेवागणेही अडचणीचे ठरते. योग्यवेळी इकडे तिकडे उड्याही माराव्या लागतात.मात्र अंबेकरांनी योग्यवेळी असे न केल्यामुळे ते कायम मागे राहिले.त्यांनी जनतेसाठी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले सामान्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या हा सरळ स्वभाव त्यांच्यानुकसानीचा ठरला असे ते म्हणाले. तर रोजेकर यांनी भविष्यातही चांगले कामकरावे चांगली माणसे सर्वांनाच हवी असल्याचे सांगून कर्तुत्वान पुत्र घडविल्याबद्दल त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद दिले.यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले की, अनेक जण पदे मिळाल्यावर सामान्य माणसापासून दुरावतात पण रोजेकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्यामुळे आपले पाय कायम जमिनीवर राहून सामान्य,माणसाशी असलेली आपली नळ कधीही तुटेल असे आपणास वाटत नाही. आपल्या यशाचाआनंद केवळ आपले नातेवाईक यांनाच आनंद होतो असे नाही तर आपल्याशी संबंध नसलेल्या अनेकांना होतो. माझ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उदाहरण देऊन विजय झाल्यानंतर सामान्य माणसाला झालेला आनंद आणि त्यावेळी आनंदानेनाचणारे सामान्य व्यक्ती पाहिल्यानंतर मी विजयी झालो, परंतु यांना एवढा आनंद का झाला असा प्रश्न मला पडला. तुमच्याशी काही काम पडेल अथवा नाही.परंतु आपल्या विषयीच्या त्यांच्या भावना मात्र अत्यंत चांगल्या असतात.त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल याची काळजी नेहमी घ्यावी.तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतांना रोजेकर यांनी मिळवलेले यश हे खर्‍या अर्थाने त्यांची योग्यता सिद्ध करते. तसेच रोजेकर यांनीअतिसामान्य व विपरीत परिस्थितीत अनेकवेळा अपयश आल्यानंतरही आपल्या

ध्येयापासून विचलित न होता प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न हा गुण सर्वांनीघ्यावा असे आवाहन भास्करराव अंबेकर यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना उपमहापौर राजेश राऊत म्हणाले की, रोजेकर यांनी मिळवलेली यश हे सर्वजिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्याकडे पाहून जिल्ह्यातीलअनेकांना प्रेरणा मिळेल. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मिळालेले यशहे खरेच वाखाण्यासारखे असून त्यांच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा अत्यंत मोठा वाटा आहे. त्यांच्या आई-वडिलांनी सोसलेल्या कष्टामुळेच त्यांना यशापर्यंत पोहोचता आले.यावेळी जालना शहराच्या प्रथम महापौर वंदना मगरे यांनीही रोजेकर यांनाअभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देतानाभिकन रोजेकर यांनी म्हटले की, मला मिळालेले यश हे सहज नाही. यासाठी मला अत्यंत कठोर अशी मेहनत करावी लागली. अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या.प्रतिकूल परिस्थितीत माझे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचं माझ्यापुढे खूप मोठेआव्हान होतं. परंतु माझ्यावर असलेला माझ्या आई-वडील व भावांचा प्रचंड मोठा विश्वास हा मला या सगळ्यातून मार्ग काढण्याची प्रेरणा देत होता.माझे यश हे माझे एकट्याचे नसून यासाठी माझे शिक्षक माझा परिवार माझे मित्र परिवार यांनीही मला कायम पाठिंबा दिला.यूपीएससी सारखी परीक्षा ही अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते परंतु उपस्थितसर्वांना त्यांनी आवाहन केले की मी हे काम करू शकलो तर कोणताही सामान्य हे काम करू शकतो फक्त त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द वप्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी अंगी असाव्यात. जिल्ह्यात सर्व पुढारीअधिकारी माझे कौतुक करीत आहेत तेंव्हा मला या शिक्षणाची काय ताकद आहे हे जाणवते असे ते म्हणाले.सत्कार समारंभ आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजन समितीचे सचिव प्रा.सत्संग मुंडे म्हणाले की, अनेक वेळा सत्कार सोहळे हे वेगवेगळ्या स्वार्थापोटी आयोजित केले जात असतात. परंतु जालन्यामध्येआयोजित केले जाणारे सत्कार सोहळे हे मागील अनेक वर्षांपासून सातत्याने जालना जिल्ह्यातील भूमिपुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित केले जातात. यात कोणत्याही प्रकारची अपेक्षा व स्वार्थ असत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष सर्व क्षेत्रातील मान्यवरवेगवेगळ्या क्षेत्रातील पदाधिकारी या कार्यक्रमासाठी हिरीरीने पुढाकारघेतात व हा कार्यक्रम घडून आणत असतात. या कार्यक्रमाचा उद्देशच जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा असल्याचे प्रा.सत्संग मुंढे यांनी सांगितले. त्याचबरोबर भिकन रोजेकर यांच्या एकूण कौटुंबिक व शैक्षणिक जीवनाचा अहवाल त्यांनी यावेळी सभागृहात मांडलात्यांची हलाखीची परिस्थिती त्यांनी त्याच्या गावात भेट दिल्यानंतर त्यांच्यासमोर असलेले दृश्य त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडले. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले.भिकन रोजेकर यांनी आपली कौटुंबिक परिस्थिती मांडताना कथन केलेले अनुभव अत्यंत हृदयविदारक होते. त्यांनी आपल्या आई -वडिलांनी अशिक्षित असतानाहीआपल्याला दिलेला पाठिंबा चार वेळा अपयश आल्यानंतरही दिलेले प्रोत्साहनखरंच सुशिक्षित व्यक्तीलाही लाजवेल याप्रमाणे होते. त्यांचे विपरीत परिस्थितीत कोणीही खचून जाऊ नका. माझे आई -वडील शेतात शेतमजूर म्हणून काम करीत होते. परंतु त्यांनी मला खूप पाठींबा. माझी परिस्थिती अत्यंत साधारणहोती. आई-वडिलांना शिक्षणाचे महत्व कळालेले असल्याने व त्यांनी शिक्षणाचीताकद जाणून घेतल्याने त्यांनी माझी हिंमत कधीच हारू दिली नाही. त्यांच्याकष्टाचे चीज केले. तुम्हीही अत्यंत चांगला अभ्यास करा. अनुभव ऐकताना अनेकवेळा उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमासाठी जालना शहरासहजिल्ह्यातून अनेक विद्यार्थी व मान्यवरांनी उपस्थित राहून रोजेकर यांनाशुभेच्छा दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम आझाद मैदानावर

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात..

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

vishwatmaklokswamivarta

भजन, कीर्तन राज्याच्या संस्कृतीचा कणा – मंत्री ॲड. आशिष शेलार कव्वाली महोत्सवाचे उद्घाटन

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..