vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात…

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी जिल्ह्यात ९ मार्च २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. सदर लसीकरणामुळे महिलांमधील गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध होतो.

 

या मोहिमेत एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येईल. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल.

 

लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चालेल व सर्व पात्र लाभार्थ्यांची तसेच दिलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर केली जाणार आहे. लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशी पोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी. लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाईल. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला तीस मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल. तरी समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या बातम्या वर व अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

 

​मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही. ज्या मुलींना मागील लसीकरणामुळे ॲलर्जी आली असेल किंवा यीस्टची ॲलर्जी असेल त्यांना ही लस दिली जाणार नाही. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना व ज्यांनी यापूर्वी कोणतीही एचपीव्ही लस घेतली असेल त्यांना या मोहिमेत लस मिळणार नाही.

 

या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच गाव पातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी केले

0000

संबंधित पोस्ट

आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद – ३३८१ अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभागी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिवस साजरा

vishwatmaklokswamivarta

450 हून अधिक महिला स्वच्छताकर्मींनी घेतला विशेष आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

vishwatmaklokswamivarta