vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील विचार व्हावा,महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील विचार व्हावा,महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

मुंबई, प्रतिनिधी- श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा. त्याचप्रमाणे पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने देखील त्यामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यात यावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्मस्थान असल्याने एकावेळी किमान 50 ते 70 हजार भाविकांची यात्रेनिमित्त सोय होऊ शकेल यादृष्टीने नियोजन असावे, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिल्या. आज दिनांक 05 मार्च, 2026 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण योग्यप्रकारे करण्यात यावे. पर्यावरणस्नेही पर्यटन (इको टूरिझम) यादृष्टीने नियोजित आराखड्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते करण्यात यावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

वज्रेश्वरी महोत्सव – विभागीय, जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन”चे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज संपन्न.

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन