vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

 

सातारा प्रतिनिधी : मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्र मार्फत १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फट्री या युनिट तर्फे माजी सैनिकांसाठी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, शेंद्रे फाटा सातारा येथे २३ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधून ५ हजार माजी सैनिक सहभागी होणार आहेत. माजी सैनिकांचे विविध प्रश्न जसे की पेन्शन, पोलिस सहायता व जमीन यासारख्या प्रश्नांवर समाधान करण्यासाठी संपूर्ण अभिलेख कार्यालय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामधून प्रतिनिधी बोलवण्यात आलेले आहेत तसेच माजी सैनिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे. मेळाव्यादरम्यान वीर माता, वीर पत्नी, वीर पिता व विविध युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार समारोह करण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा.

 

0000

संबंधित पोस्ट

नागरिकांनी कायद्याचे पालन करून नागपंचमी सण साजरा करावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल “इंडियाज गॉट लेटेंट शो” विरुद्ध तक्रार दाखल.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना- पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ; सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी

vishwatmaklokswamivarta