vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे

 अहिल्यानगर परिसरातील विविध रस्ते कामांचा पुढील १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश  विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

मुंबई प्रतिनिधी: ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित रस्ते कामांना गती देण्यात यावी. या अनुषंगाने कर्जत-जामखेड, जि. अहिल्यानगर परिसरातील विविध रस्ते कामांचा पुढील १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश  विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुका व परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्ते कामांबाबत आज विधानभवन येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीत काष्टी, श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगण, डिकसळ, म्हाळसुंदा–निंबे, आळसुना–निंबे–आंबेजळगाव तसेच कोंभळी फाटा ते कोंभळी या प्रमुख मार्गांसह सर्व प्रलंबित रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामातील विलंबाबाबत जबाबदारी निश्चित करून प्रलंबित कामांची सखोल चौकशी करावी आणि आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले. तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर द्यावा असेही सांगितले.

संबंधित पोस्ट

शांतता समितीची बैठक;*बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

मान्सूनमधील आपत्तीत एकही मृत्यू होऊ नये- जिल्हाधिकारी सौरभ कटियार*मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*

सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे