vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*

नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नेरूळ सेक्टर 46-48, नेरूळ बस स्थानक, सीबीडी, घणसोली – घरोंदा, पनवेल रेल्वे स्थानक, खारघर सेक्टर 35, खारकोपर रेल्वे स्थानक या ठिकाणहून मंत्रालय (वर्ल्ड ट्रेड सेंटर) करिता वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मार्गावरील दैनंदिन बस संचलन सुरळीत राहणेकरिता कार्यान्वित असलेला कोणताही मार्ग बंद न करता मार्ग क्र.106, मार्ग क्र.108, मार्ग क्र.110 व मार्ग क्र.114 या मार्गाचे सुधारीत वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
1. मार्ग क्र. 106 – पनवेल रेल्वे स्थानक ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
पनवेल रेल्वे स्थानक – रद्द केलेली फेरी : 7.20 – सुरू असलेली फेरी : 7.50
मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर – रद्द केलेली फेरी : 16.50 – सुरू असलेली फेरी : 18.20

2. मार्ग क्र. 108 – नेरूळ सेक्टर 46/48 ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
नेरूळ सेक्टर 46/48 – रद्द केलेली फेरी : 7.50 – सुरू असलेली फेरी : 8.15
मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर – रद्द केलेली फेरी : 17.15 – सुरू असलेली फेरी : 18.30

3. मार्ग क्र. 110 – खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
खारघर सेक्टर 35 – रद्द केलेली फेरी : 7.10 – सुरू असलेली फेरी : 7.30
मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर – रद्द केलेली फेरी : 17.50 – सुरू असलेली फेरी : 18.40

4. मार्ग क्र. 114 – घणसोली घरोंदा ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
घणसोली घरोंदा – रद्द केलेली फेरी : 7.40 – सुरू असलेली फेरी : 7.55, 8.10
मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर – रद्द केलेली फेरी : 17.05 – सुरू असलेली फेरी : 17.35, 18.05

तसेच मार्ग क्र.107 – सिबीडी – मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर, मार्ग क्र.115 – खारकोपर रेल्वे स्थानक – मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर,
मार्ग क्र.116 – तुर्भे/नेरूळ – मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे ‘अटल सेतू’ व मार्ग क्र.117 – खारघर/पनवेल – मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे ‘अटल सेतू’ या मार्गावरील कार्यान्वित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही.
सदर मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी उपरोक्त सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेवून सहकार्य करण्याबाबत परिवहन प्रशासनाने विनंती केली आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

क्षेत्रपाल धनगरवाडीतील 26 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य दरड कोसळल्यानंतर तातडीची कार्यवाही; वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे विभागाची जबाबदारी – पालकमंत्री संजय राठोड उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे आढावा

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

vishwatmaklokswamivarta