vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 

नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात 28 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 11 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 28 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 11 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती पारदर्शक पद्धतीने;कुठल्याही आमिषाला बळी पडू नका

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेतील सहभागासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

vishwatmaklokswamivarta