vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

आरोग्य सांगली, प्रतिनिधी : देश, विदेशातील नागरिक सांगली, मिरज येथे उपचारासाठी यावेत, रूग्णांना किफायतशीर व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सन 2030 पर्यंत सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, आयएमए व विविध रूग्णालयांचे डॉक्टर, टुरिझम व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, रूग्णांना पुणे, मुंबई या मेट्रो सिटी सारख्या शहरात जे अत्याधुनिक उपचार, सुविधा मिळतात ते उपचार, सुविधा आपण आपल्या शहरात किफायतशीर किंमतीत दर्जेदार दिल्या तर आसपासच्या जिल्ह्यातील तसेच देश, विदेशातील लोक आपल्या शहराकडे आकर्षित होतील. चांगल्या रूग्णसेवेची व उच्च दर्जाच्या उपचाराची आपल्या शहरातील डॉक्टरांची ख्याती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. सन 2030 पर्यंत सांगली, मिरज मेडिकल हब म्हणून कसे नावानुरूपास येईल या दृष्टीने व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यासाठी उपाययोजना सूचवाव्यात. यामध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश असावा. यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करून अवयवदानाबाबतही जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी डॉक्टर्स व अन्य मान्यवरांनी विविध उपाययोजना सूचविल्या.

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा— खा. श्रीरंग बारणे,जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शिवकालीन शिवशस्त्र व वाघनखे बघण्याची नागपुरकरांना संधी

vishwatmaklokswamivarta

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन