vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

        सांगली, द प्रतिनिधी) : आपल्या मृत्यूनंतरही आपली आयुष्यभराची पुंजी समाजाच्या कामी यावी, या उदात्त भावनेतून सांगलीतील दिवंगत शिक्षिका हेमा विजय भडभडे यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा पाटील उपस्थित होत्या.

  समडोळी हायस्कूल, समडोळी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या हेमा भडभडे यांनी आपल्या अध्यापन काळात शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. केवळ ज्ञानदानच नव्हे, तर उच्च नीतीमूल्ये जोपासणाऱ्या हेमा भडभडे यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या कमाईमधील 5 लाख रूपये समाजोपयोगी कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास द्यावेत, अशी एक विशेष तरतूद केली होती. याच इच्छेचा मान राखून त्यांचे नातेवाईक केदार किशोर सहस्त्रबुद्धे व सौ. भाग्यश्री किशोर सहस्त्रबुद्धे यांनी 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मदतीचा हात पुढे केला.

     जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या दातृत्वाचा गौरव केला. यावेळी ते म्हणाले, विविध आपत्कालिन परिस्थितीत आणि गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा सामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरतो. हेमा भडभडे यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तींमुळेच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात मिळतो. त्यांची ही मदत गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. नागरिक, संस्था आणि उद्योजकांनी अशा प्रकारे स्वेच्छेने पुढे येणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

0000000

संबंधित पोस्ट

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे- मुख्यमंत्री आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन;• खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल• गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ