vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता 8 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी नियमित शुल्कासह 8 डिसेंबरपर्यंत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. विलंब शुल्कासह 15 डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह 23 डिसेंबर तर अति विशेष विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही माहिती भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

vishwatmaklokswamivarta

मुंबईत दसरा आणि नवरात्र उत्सवासाठी ३०,००० पोलिस कर्मचारी तैनात

विशेषलेख -कोकणातील साहित्यिक वाटचाल

vishwatmaklokswamivarta

भारताच्या परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादन करावे – आमदार विलास तरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…