vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार – आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम 

गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार – आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम

 

 बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील सर्व गावामध्ये शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते कालबद्धरितीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने २० जानेवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून या कालबद्ध कार्यक्रमाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नुकतेच जारी केले आहे.

 या कालबद्ध कार्यक्रमानुसार, पहिल्या टप्प्यात दि २० ते २४ जानेवारीपर्यंत संबंधित गावच्या तलाठी यांनी उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडुन ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग नमूद असलेले गाव नकाशे प्राप्त करुन घेणे.

दुसऱ्या टप्प्यात दि. २५ ते ३१ जानेवारी पर्यंत या नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्याची यादी तयार करणे.

 तिसऱ्या टप्प्यात दि. १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत बंद असलेले रस्ते ज्या भुमापन क्रमांकातून जातात त्यांचे भोगवटाधारकांची यादी तयार करणे. चौथ्या टप्प्यात दि. ८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत भोगवटाधारक व गावातील सरपंच व इतर सहधारक यांची सदर रस्ता खुला करण्याबाबत बैठक आयोजित करुन समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार तहसिलदार यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात सर्व पक्षकार गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सेवक यांच्या समवेत त्या त्या वादग्रस्त ठिकाणी स्थळ निरीक्षण करुन बैठक घेऊन संपवुन सर्व सहमतीने रस्ता खुला करण्यासाठी व दावा निकाली काढण्यासाठी लोकअदालतीच्या निकषानुसार प्रकरणात निर्णय घेणे.

 पाचव्या टप्प्यात दि. १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्या टप्प्यातील प्रयत्नातून रस्ता खुला होत नसल्यास उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्या सहाय्याने रस्ता निश्चित करुन पोलिसांचे सहाय्याने तो खुला करणे.

 या कालबद्ध कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात दि. १ ते ३१ मार्चपर्यंत पाचव्या टप्प्यानुसार रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार अर्ज प्राप्त करुन घेऊन उचित नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 या कालबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी),सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलीस निरीक्षक यांनी समन्वयाने कामकाज करून ग्रामीण भागातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब) पायमार्ग कालबद्धरितीने खुले करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.. ०००

संबंधित पोस्ट

राज्यातील नाशिक रेड अलर्ट-आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ;सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन-दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू